ठाणे मनोरुग्णालयात संजय राऊतांना जागा आहे, तेथे आम्ही सोय करु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avinash Jadhav

कारागृहमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठिक नाही. ते काय बोलतात त्यांनाच कळत नाही. राऊत यांना आम्ही फार महत्त्व देत नाही.

Avinash Jadhav : ठाणे मनोरुग्णालयात संजय राऊतांना जागा आहे, तेथे आम्ही सोय करु

डोंबिवली - कारागृहमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठिक नाही. ते काय बोलतात त्यांनाच कळत नाही. राऊत यांना आम्ही फार महत्त्व देत नाही. गरज असल्यास, आमची मदत हवी असल्यास ठाण्यातील मनोरुग्णालयात जागा आहे. तेथे आम्ही त्यांची सोय करु असा खोचक टोला ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आला. राज्यपाल कोश्यारी सध्या पत्र लिहायचे विसरले असून त्यांनी ही जबाबदारी अन्य कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर दिली आहे का ? असे विधान करुन राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष केले होते.

कल्याण ग्रामीण भागातील अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात मनसे अंबरनाथ तालुका कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी उल्हास भोईर, तालुका अध्यक्ष नकुल पावशे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधतना थेट शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत हे जेलमधून बाहेर आले तेव्हापासून त्यांची मानसिक स्थिती ठिक नाही. ते काय बोलतात, काय बडबडतात हे त्यांना कळत नाही. परवा नारायण राणे यांच्यावर त्यांनी टिका केली तेव्हा काय बोलत होते त्यांना कळत नव्हत. राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही. गरज पडल्यास आमची मदत लागल्यास ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही सोय करु असे जाधव यांनी सांगितले.

कल्याण जवळील मलंगगडावर भगवा फडकविण्यापासून तरुणांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोखले. यावर बोलताना जाधव म्हणाले, महाराष्ट्राचे हे दुर्दैव असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्रात फडकविल्यानंतर जर तरुणांना अटक केली जात असेल तर हे दुर्भाग्य पूर्ण आहे. कायदा सुव्यवस्था या नावावर किती वेळा तुम्ही या सर्व गोष्टी करणार आहात. एक दिवस असा येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः मलंगगडावर जाऊन भगवा फडकवेल असे सूचक विधान करत त्यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.