लाव रे तो व्हिडीओ....; सुषमा अंधारे ची सभा व्हिडीओने गाजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, किरिट सोमय्या, अनंत तरे यांचे व्हिडीओ व्हायरल करत त्यांचेच डाव त्यांच्यावर अंधारे यांनी उलटवल्याचे त्यांच्या भाषणात दिसून आले.

Sushma Andhare : लाव रे तो व्हिडीओ....; सुषमा अंधारे ची सभा व्हिडीओने गाजली

डोंबिवली - 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं राज्याच्या राजकारणात धुमाकुळ घातला होता. विरोधक मातब्बर नेत्यांनी देखील राज यांच्या व्हायरल व्हिडीओचा धसका घेतला होता. मनसेचा हाच पॅटर्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वापरत सध्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. कल्याण पूर्वेतील सुषमा अंधारे यांचे महाप्रबोधन यात्रा ही 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानेच गाजली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, किरिट सोमय्या, अनंत तरे यांचे व्हिडीओ व्हायरल करत त्यांचेच डाव त्यांच्यावर अंधारे यांनी उलटवल्याचे त्यांच्या भाषणात दिसून आले. भाजपाने ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा टोला लगावत खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच हे कबुल केल्याचा व्हिडीओ त्यांनी सभेत दाखवला. माझे 40 भाऊ कॉपी करुन पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहे. माझ्या भावांकडे कपडे फाडण्याची खाती दिली आहेत असा खोचक टोला त्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगणावर शिवसेना उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गुरुवारी पार पडली. अंधारे यांनी सुरुवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्याविषयी फडणवीस यांनी केलेले वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल केला. राज यांची अवहेलना देवेंद्रंनी केली तरी त्यांच्या नादाला लागून भावाच्या दुःखाची टिंगल कशी करु शकतात असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बीकेसीली करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी सोमय्या गप्प का?

अंधारे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली. संजय राठोड हे आता निर्दोष वाटत असतील तर पूजा राठोडची जाणीवपूर्वक बदनामी केली. तिची राजकीय शिडी केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. बिकेसीला मेळावा झाला, करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी किरीट सोमय्या गप्प का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.

अण्णा तुम्ही कोठे गेलात, मी शोधतेय तुम्हाला

आंदोलन करणारे अण्णा हजारे आता कोठे गेले आहेत ? लवकर उठा अण्णा, तुम्ही आधुनिक काळातील गांधी आहात असे तुम्हाला म्हटले जाते. तुम्ही आता कोठे गेले आहात. मी तुम्हाला शोधत आहे, मला मदत करा असा टोला त्यांनी हजारेंना लगावला.

महापुरुषांचा अवमान होत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प

महापुरुषांचे अपमान होताना देवेंद्र फडणवीस गप्प बसलेत असेही अंधारे म्हणाल्या. कर्नाटकमध्ये आमच्या गाड्या तोडतात, त्यांचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलतात पण आमचे मुख्यमंत्री जेवायला, गरबा खेळायला, गुवाहाटीला जातात असेही त्या म्हणाल्या. महापुरुषांचा अवमान होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटलाय, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार शब्दही बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे अंधारे म्हणाल्या. तुम्हाला सावरकर इतके प्रिय होते तर त्यांना भारतरत्न का दिला नाही? गुजरातमध्ये सर्वात मोठा पुतळा उभारताना सावरकरांचा पुतळा का नाही उभारला? असा सवालही अंधारेंनी भाजप नेत्यांना केला. ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, बच्चू कडू यांची अवस्था झाली तशीच अवस्था या 40 जणांची होणार आहे.

त्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का शांत?

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांचे अपमान करून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे सांगत अंधारे यांनी यावेळी टिका केली. तर महाराष्ट्राचा इतका अपमान सुरू असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शांत का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सावरकरांना अद्याप भारत रत्न का नाही.?

तर एकीकडे भाजपकडून सतत सावरकर प्रेम दाखवले जात असताना तिकडे गुजरातमध्ये मात्र काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा का उभारला गेला? तुम्हाला सावरकर इतके प्रिय होते तर त्यांना भारतरत्न का नाही दिला नाही? असे प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना यावेळी विचारले. तर ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, बच्चू कडू यांची अवस्था झाली आहे. तशीच अवस्था शिवसेना सोडून गेलेल्या या 40 जणांची होणार आहे. आपले 40 भाऊ कॉपी करून पास झाले असून त्यांना हे कळत नाही की सरकारमध्ये सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. आणि माझ्या भावांकडे मात्र सगळी कपडे फाडण्याची खाती असल्याची मिश्किल टिका अंधारेंनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री...

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्याच इशाऱ्याने हे सरकार चालत आहे. नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गाच्या पाहणीदरम्यान गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिसले. यावरून हेच अधोरेखित होत असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल करत त्यांनी शिंदे यांनी खुद्द फडणवीस यांचा मुख्यमंत्री फडणवीस असा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाव रे तो व्हिडिओ...

यावेळी सुषमा अंधारे यांनी या सभेमध्ये किरीट सोमय्या, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील अशा भाजपसह सत्ताधाऱ्यांमधील विविध नेत्यांचे छोटे छोटे व्हिडीओ लावून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले, त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता चौकशा कशा काय थांबल्या? कारण भाजप ईडीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचे सध्याच्या परिस्थिती वरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगतले.

पलावाचे शेअर्स पोहचल्याने मुख्यमंत्री गप्प

कल्याण शीळ रोडवर डोंबिवलीमध्ये पलावा सिटी, आमदार मंगलप्रभात लोढा आणि कंपनीने उभी केली. त्याचे शेअर कोणाकोणाला दिले आहेत. ते एकदा विचारून घ्या. कारण माझ्याकडे त्याचे कागदपत्रे आहेत, त्यांचे शेअर्स पोहोचल्यामुळे मंगलप्रभात लोढा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार शब्द काढत नाही, कारण 'अपना काम बनता, भाड में जाये जनता' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केले आहेत.

कल्याणातील केबल लाईन बंद

माझ भाषण कल्याणकरांनी ऐकू नये म्हणून इथल्या नेत्यांनी केबलची लाईन बंद केली आहे. मात्र त्यांना माहिती नाही जरी केबलची लाईन बंद केली तरी नागरिकांच्या हातातील मोबाईल मधून मी दिसणार ते कसे काय बंद करणार हे कोणीतरी जाऊन सांगा त्यांना असे त्यांनी सांगितले.