डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या 15 मीटर रस्त्याला बाधित होणारे 25 व्यापारी गाळे हटविण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या 'ह' प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली. यामुळे आता या मार्गाचे रुंदीकरण होणार असून वाहन कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.