

BJP Strengthens Hold in Dombivli with Unopposed Wins
Sakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने डोंबिवलीत बिनविरोध विजयांची मालिका अधिक भक्कम करत पॅनल क्रमांक 19 मध्ये थेट तीन उमेदवार निर्विवाद निवडून आणले आहेत. महेश पाटील यांच्या बिनविरोध निवडीनंतर काही तासांतच त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील यांचीही बिनविरोध निवड झाल्याने ‘भावा-पाठोपाठ बहीण’ असा राजकीय योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.