

डोंबिवली : 30 - 27 वर्षाची परंपरा असलेल्या डोंबिवली शहरात रविवारी हिंदू नववर्षानिमित्त भव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढण्यात आली. यावेळी विविध स्तरातील नागरिक पारंपारिक पेहरावात स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. लेझीम, ढोल ताशा पथकांच्या गजरात स्वागत यात्रा निघाली. चौकात जागोजागी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात येत होते. या स्वागत यात्रांच्या माध्यमातून डोंबिवली मध्ये समृद्ध संस्कृती संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर करणारे चित्ररथ सजविण्यात आले होते.