
Dombivli Crime
Sakal
डोंबिवली : डोंबिवलीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 37 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. तिच्यावर जबरदस्ती अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला जोरदार प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. घडलेला प्रकार तिने आईला सांगताच आईने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी इकबाल नन्हेबक्ष अन्सारी (वय 37) याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.