
डोंबिवली : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 वर्षीय मुलीचे एका मसाला विक्रेत्याने अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करून तिला एका दाम्पत्याकडे ठेवले. त्यांनी तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी सदर दाम्पत्याच्या घरी छापा टाकत मुकीची सुटका केली.