
डोंबिवली : कल्याण परिमंडळ तीन हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याने, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रभावी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले आहेत.