

Dombivli Handa Morcha
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर गाव परिसरात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात शुक्रवारी नागरिकांनी केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. यावेळी केडीएमसीच्या नगरसेविका ज्योती पाटील, पवन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.