dombivali accident
sakal
डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील छेडा रोडवर एका 75 वर्षीय महिलेला पालिकेच्या विद्युत कंत्राट गाडीने चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तृप्ती म्हसकर (वय-75) असे मृत महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली असून याचा तपास केला जात आहे.