Dombivli News : रीलस्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Crime Investigation : डोंबिवलीतील रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप करत मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Dombivli News
Dombivli News Sakal
Updated on

डोंबिवली : विविध गुन्ह्यांमध्ये डोंबिवलीतील मानपाडा, कल्याणमधील कोळसेवाडी आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल असलेल्या ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय 53) यांच्यावर नाशिक येथील एका तरूणीने दोन दिवसापूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एका घटस्फोटित महिलेने सुरेंद्र यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून त्यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशावरून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com