थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

मुंबई : एखादी वस्तू उचलताना हात थरथरणे, खाता-पिताना किंवा कोणतीही दैनंदिन कामं करताना सतत हा थरथरणे, अशी जर लक्षणे जाणवत असतील तर वेळीच तपासणी करून घ्या. कारण हात थरथरणं हे मेंदूच्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. पुण्यातील 68 वर्षांच्या शुभदा तेले. आठ वर्षांपासून त्यांचा हात थरथरत होता. अगदी हाताने एखादी वस्तू उचलणंही त्यांना शक्य होत नव्हतं. स्वयंपाक करणं सोडा त्यांना स्वत:च्या हाताने जेवताही येत नव्हतं, ना पाणी पिता येत होतं. त्यांनी अनेक उपचार केले, औषधं घेतली. मात्र, त्यानंतर हातांचं थरथरणं तात्पुरतं थांबायचं. त्यांना इसेन्शिअल ट्रेमर (essential tremor) हा आजार असल्याचं निदान झालं. इसेन्शिअल ट्रेमर (ईटी) हा आजार पार्किनसन्स डिसीज (पीडी) या आजाराशी मिळताजुळता आजार आहे. मात्र यात एखादी क्रिया करताना कंप निर्माण होतो. 

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील मुव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकचे प्रमुख आणि डीबीएस प्रोग्रॅमचे इन्चार्ज डॉ. पंकज अगरवाल म्हणाले, "इसेन्शिअल ट्रेमर हा एक मेंदूविकार आहे. या आजारात दोन्ही हात, डोके आणि आवाजात अनियंत्रित कंप निर्माण होतो. याची सुरुवात बहुधा वयाच्या 60 वर्षांनंतर होते, पण तो तरुण वयातही होऊ शकतो. याचे कारण अज्ञात आहे. पण, त्यामुळे नियंत्रित हाचलाल करणाऱ्या मेंदूतील नेटवर्कमध्ये असाधारण लयबद्ध दोलन क्रिया होते. "

या आजारात औषधं एका मर्यादेपर्यंत मदत करू शकतात. पण, गंभीर स्वरूपात रुग्णाला थॅलेमिक डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) दिलं जातं. या अंतर्गत शरीराच्या कंपावर नियंत्रण मिळवणाऱ्या मेंदूतील पेशींना स्टिम्युलेशन देण्यात येतं. यात अत्यंत बारीक धातूच्या तारा मेंदूमध्ये घातल्या जातात. तारांमधून विद्युत स्पंदने पाठवण्यात येतात आणि काही हालचाली नियंत्रित करता येतात. ताठरपणा, मंदत्व आणि कंप यासारख्या आजारांवर या उपचारांचा चांगला परिणाम होतो.

तेले यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार करण्यात आले. तब्बल 4 तास ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना त्या शुद्धीत होत्या. यावेळी चमचा वापरणे, पेनाने लिहिणे यासारख्या क्रियांची कृती डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. तार काळजीपूर्वक मेंदूतील त्या विशिष्ट भागात घातली तेव्हा हाताच्या कंपावर तात्काळ नियंत्रण मिळाल्याचं दिसून आलं.

डॉ. अगरवाल यांनी सांगितलं, " शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी तेले यांनी स्वतःच्या हाताने घास खाल्ला, पाणी न सांडता आणि हलवता प्यायल्या. हे तब्बल तीन वर्षांनी घडत होते. डीबीएसमुळे कंप निघून जाऊन शकतो आणि यांच्यासारख्या काही रुग्णांना पूर्ण दिलासा मिळू शकतो"

आपण या आजारातून बरं झाल्यानंतर सुलभा यांनाही आनंद झाला आहे. "गेली 4 वर्षे मी पूर्णपणे माझ्या कुटुंबियांवर अवलंबून होते आणि याचा मला खूप त्रास होत होता. पण आता उपचारांनंतर मी जेवू शकते, पिऊ शकते आणि माझी दैनंदिन कामे करण्यासाठी माझे हात वापरू शकते. तब्बल 4 वर्षांनी माझ्या 25 वर्षांच्या मुलासाठी जेवण तयार करू शकते. आता मी माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगू शकते. किंबहुना हे माझ्यासाठी एक नवीन आयुष्यच आहे", असं शुभदा म्हणाल्या.

dont avoid if your hands are shaking on regular basis this might lead to serious brain problem

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com