मुंबई सोडून जाऊ नका; घर झाल्यावर चहाला बोलवा; मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज मोठ्या दिमाखात आज करण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील असे मान्यवर या वेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील पत्राचाळ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना आपलं हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, असं आवाहन केलं आहे.

Uddhav Thackeray
''संपात सहभागी झाल्यास...'' राज्य सरकारने दिला कर्मचाऱ्यांना इशारा

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनावेळी म्हणाले की, अनेकजण या क्षणाची वाट बघत बघत आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांची आठवण ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही आपल्या हक्काच्या या नव्या घरात पाऊल ठेवाल तेव्हा कृपया हे घर सोडून मुंबई सोडून जाऊ नका. नाही तर हा संघर्ष वायाला जाईल. ही सर्व मेहनत वाया जाईल आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्यामुळे जसा जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केला आणि हा संघर्ष जिंकला. त्यामुळे आपलं हक्काचं घर सोडू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

Uddhav Thackeray
'आम्ही माफीवीरांचे वंशज नाही'; लालूंच्या भडकलेल्या मुलीने केला सावरकरांचा उल्लेख

उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की पत्राचाळ हा विषय अनेकांना माहीत आहे. त्याचे दळण अनेक वर्षे दळल जात होते. पत्रा चाळीत काही महिन्यांपूर्वी संघर्ष समिती भेटायला आली होती. तेव्हा आम्ही त्यांना वचन दिले होतं. हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांना दिला होता. सगळ्या अडचणी दूर करून हा मुहूर्त आज साधला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com