esakal | संजय राऊत यांना गांभीर्याने घेऊ नका - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

narayan-rane.jpg

सचिन वाझेंना शिवसेनेचा आसरा आहे.

संजय राऊत यांना गांभीर्याने घेऊ नका - नारायण राणे

sakal_logo
By
दीनानाथ परब

सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका करताना नारायण राणे यांनी रवी पुजारीचे नाव घेतले. रवी पुजारीचा संबंध त्यांनी या प्रकरणाशी जोडला. सध्या तुरुंगात असलेल्या रवी पुजारीचा कोण वापर करत होतं? हे तो सांगेलच असे नारायण राणे म्हणाले. 

सचिन वाझे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते, या प्रश्नावर राणे म्हणाले कि, "सचिन वाझेंना शिवसेनेचा आसरा आहे. म्हणूनच तो बेकायदेशीर काम करतोय. वाझेंच्या जीवावर धमक्या दिल्या जातात. नाहीतर तुम्हाला संपवून टाकू असे सांगितले जाते. वाझेंची पोस्टिंग मुंबईत केली जाते. याचाच अर्थ मुंबईत कोणीतरी गॉडफादर आहे ते लवकरच बाहेर येईल."

अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून सचिन वाझेंविरोधात कारवाई करण्यात येतेय असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे, त्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की, "संजय राऊत शिवसेनेची बाजू घेणारच. पदरात काही तरी पडेल म्हणून काही जण मातोश्रीच्या बाजूने बोलत आहेत. काही लोक बोलायचे टाळतायत. सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. संजय राऊत यांना गांभीर्याने घेऊ नका, ते कधीही खरं आणि वास्तववादी बोलत नाहीत."
 

loading image