esakal | PF मधून पैसे काढणाचं प्रमाण वाढलं; अर्थतज्ज्ञ देतायत 'हा' महत्त्वाचा सल्ला... 
sakal

बोलून बातमी शोधा

PF मधून पैसे काढणाचं प्रमाण वाढलं; अर्थतज्ज्ञ देतायत 'हा' महत्त्वाचा सल्ला... 

"येते एक-दीड वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत खडतर असेल, त्यामुळे नोकरदारांनी सध्या कसेही करून भागवावे, नंतर अगदीच काही नसेल तर हा विचार करता येईल." 

PF मधून पैसे काढणाचं प्रमाण वाढलं; अर्थतज्ज्ञ देतायत 'हा' महत्त्वाचा सल्ला... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : निवृत्तीनंतरच्या म्हातारपणाच्या आयुष्याची पूंजी असलेली भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम काढू नका, असा तज्ञांचा सल्ला असूनही महिन्याभरात साडेसात लाख कर्मचाऱ्यांनी पीएफ मधून सुमारे अडीच हजार कोटी रुपये काढले आहेत. कोरोनामुळे सर्वांवरच आर्थिक संकट आले असल्याने त्यावर मात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पीएफ मधून मर्यादित रक्कम काढण्याची संमती मार्च अखेरीस केंद्र सरकारने दिली. या विशेष योजनेनुसार ही रक्कम एकदा काढल्यावर पुन्हा पीएफ मध्ये भरण्याचीही गरज नाही. तीन महिन्यांचा पगार (बेसिक अधिक डीए) किंवा पीएफ खात्यातील शिलकीच्या पंचाहत्तर टक्के (यापैकी कमी असेल ती) रक्कम काढण्याची सोय आहे. ज्यांच्याकडे यूएएन क्रमांक आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम काढता येते. त्यानुसार एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडील आकडेवारीनुसार या योजनेत साधारण साडेसात लाख कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपये काढले आहेत. 

राज्यात सर्व कोरोना रुग्णांचे उपचार मोफत; खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप

विशेष म्हणजे हे पैसे काढणाऱ्यांमध्ये लहान कंपन्यांमध्ये अंगमेहनतीची कामे करणारे व कमी पगार घेणारे कामगार आहेत, तसेच संगणकाची कामे करणारे टीसीएस सारख्या IT कंपन्यांमधील व्हाईट कॉलर बाबू देखील आहेत. या योजनेनुसार रोज सुमारे तीस ते पस्तीस हजार लोक पैसे काढण्यासाठी अर्ज करीत आहेत. यावरून लोकांपुढील आर्थिक संकट किती गंभीर आहे हेच दिसते अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

एप्रिल महिन्यातील EPFO कडील आकडेवारीनुसार सुमारे तेरा लाख कर्मचाऱ्यांनी चार हजार सहाशे कोटींपेक्षाही जास्त रक्कम काढण्यासाठी अर्ज केले. त्यातील निम्मी मागणी ही सरकारच्या कोरोना विशेष योजनेतील होती. टीसीएस, ओएनजीसी, एचडीएफसी बँक आदी अनेक कंपन्यांचे पीएफ रकमेसाठीचे स्वतःचे ट्रस्ट आहेत. त्यातूनही एप्रिलमध्ये ऐंशी हजार लोकांनी सुमारे नऊशे कोटी रुपये या योजनेतून काढले. यात 22 खासगी कंपन्यांच्या 55 हजार कर्मचाऱ्यांनी पाचशे कोटी रुपये (प्रत्येकी 90 हजार रु.) काढून घेतले. 

धक्कादायक ! उपचारांनंतरही फुफ्फुसांमध्ये लपून राहतो कोरोना? काय सांगतायत वैज्ञानिक?

पीएफ काढू नका

अत्यंत मोठी अडचण असल्याखेरीज व पैशांचे अन्य सर्व मार्ग संपल्याखेरीज पीएफ मधील रक्कम काढू नका, असे अर्थसल्लागार नेहमीच सांगतात. या योजनेनुसार काढलेली रक्कम पीएफ मध्ये पुन्हा गुंतवता येणार नसल्याने त्यावरील चक्रवाढ व्याजाला मुकावे लागेलच. पण त्याशिवाय निवृत्तीनंतर मिळणारी करमुक्त, कोणताही धोका नसलेल्या व सरकारची हमी असलेल्या योजनेतील मोठी रक्कम बुडते, असेही अर्थतज्ञ दाखवून देतात. अगदी मोठी वैद्यकीय आणिबाणी असेल तरच ही रक्कम काढा, अन्यथा पुढचा काळ कठीण असल्याने आताच ही रक्कम संपवू नका, असे गुंतवणुक सल्लागार विनायक कुलकर्णी यांनी सकाळ ला सांगितले. येते एक-दीड वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत खडतर असेल, त्यामुळे नोकरदारांनी सध्या कसेही करून भागवावे, नंतर अगदीच काही नसेल तर हा विचार करता येईल. सध्या लग्न आदी आवश्यक बाबीही कमी खर्चात कराव्यात, अन्य खर्च पुढे ढकलावेत. अगदीच गरज असेल तर पीएफ ची रक्कम न काढता घरातले सोने विकले तरीही चालू शकेल, असेही ते म्हणाले.

dont withdraw money from PF account see what economic experts are saying