डॉ. मकरंद व्यवहारे यांची नार्को टेस्ट करा - मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - न्याय मिळतोय ही स्थिती आता देशात राहिली नाही. दिवंगत न्या. बी. एच. लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शवविच्छेदन अहवालावर देण्यात आला आहे, असे स्पष्ट करत न्या. लोया यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर मकरंद व्यवहारे यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली आहे.

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांच्या अधिकारात शवविच्छेदन अहवाल तयार केला ते डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. 2015 मध्ये शवविच्छेदन अहवाल बदलतात, असा आरोप व्यवहारे यांच्यावर त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामुळे 2014 मध्येही त्यांनी अहवाल बदलला नसेल हे कशावरून ठरवायचे? त्यामुळे डॉ. व्यवहारे यांची नार्को टेस्ट करावी; त्यात सत्य समोर येईल, अशी मागणीही नवाब मलिक यांनी या वेळी केली.

पक्षाच्या निवडणुका
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे. पक्षाची निवडणूक ही दर तीन वर्षांनी होत असते. जिल्हा कार्यकारिणीच्या निवडणुकांबाबत 22 एप्रिल रोजी बैठक पार पडेल. राज्य पातळीची तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत येत्या 29 एप्रिल रोजी पुणे येथे बैठक होईल. 13 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

Web Title: dr. makrand vyavhare narko test nawab malik