
मुंबई - महाराष्ट्राने आहिल्याताई रांगणेकर, सुशीला नायर, मृणाल गोरे यांच्यापासून अनेक सशक्त महिला नेतृत्व दिले आहे, या पक्तींत नीलम गोऱ्हे बसतात. या शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचा गौरव केला. निमीत्त होते.. निलम गोऱ्हे यांच्या आयुष्यातील वाटचालीवर आधारीत 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
राजभवनात रंगलेल्या या प्रकाशन सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उशीरा आले. मात्र चौफेर राजकीय टोलेबाजी करायची संधी त्यांनी सोडली नाही. पुण्याच्या राजहंस प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित करण्य़ात आले आहे. लेखिका करुणा गोखले यांनी हे पुस्तक शब्दबध्द केले आहे. या पुस्तकात निलम गोऱ्हे यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला आहे.
या वेळी बोलताना निलम गोऱ्हे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत योगदान असलेल्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांचा आवर्जुन उल्लेख केला. ५५ वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळाला एक महिला उपसभापती मिळाला याचे स्मरण करुन पालिका शाळा ते राजभवनापर्यंतचा प्रवास त्यांनी विषद केला.
निलम गोऱ्हे यांचे पणजोबा बडोद्याचे राजकवी होते. साहित्याची पंरपरा निलम गोऱ्हे यांच्यापर्यंत आली असल्याचा उल्लेख संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिवसेनेची संकल्पना होती.
शिवसेनेचे हे ब्रिदवाक्य गोऱ्हे यांनी जपले आहे.राजकारणी कधीच ऐसपैस गप्पा मारत नाही मात्र निलम गोऱ्हे त्याला अपवाद आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा एक दस्तावेज ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हे पुस्तक गोऱ्हे यांच्या आयुष्याच्या अनेक अव्यक्त पैलूवर प्रकाश टाकणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानी हे पुस्तक वाचावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मी आणि निलमताई या तशा मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे आहोत. आम्ही इतरांसारखे टोमणे मारत नाही. काम करण्यास बंधने आली म्हणून सारासार विचार करुन त्या आमच्या पक्षात आल्या असे सांगत त्यावेळी त्या सत्तेवरच होत्या याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.
उपसभापती पदावर असतानी त्यांनी विरोधक आणि सत्ताधारी असा भेदभाव केला नाही. सर्वांना न्याय दिला. आम्ही दोघांनीही आमच्यातला कार्यकर्ता अजूनही जपला आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय झाला की निलम गोऱ्हे आपला प्रोटोकॉल बाजूला सोडून मदत करतात असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगीतले.
यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी पुरुषप्रधान राजकारण आपला व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवलेल्या निलम गोऱ्हे यांचे हे पुस्तक म्हणजे सर्व महिलांची कहाणी असल्याचे सांगीतले. राजकारणात येवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे पुस्तक म्हणजे एक वाट आहे. गोऱ्हे यांचे लैंगिक समानता, महिला आणि दलित, पिडितांसाठीचे काम अत्ंयत महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.