Mumbai : उत्तर आधुनिक काळाची समीक्षा घडवण्यासाठी डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ग्रंथ महत्त्वाचा - डॉ. सदानंद मोरे

१० वर्षाचा कालवधी नजरेसमोर आहे. उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा संशोधनासाठी विषय निवडला आणि सुरुवातीपासून सप्रे सरांनी दिशा दिली, अनेक सा-यांची मदत झाली. या प्रक्रियेतत खूपजण आहेत.
 dr sadanand more says dr minakshi patil book Uttar Adhunikata Ani Marathi Kavita modern era
dr sadanand more says dr minakshi patil book Uttar Adhunikata Ani Marathi Kavita modern eraSakal
Updated on

Mumbai News : समीक्षकाला समीक्षेची भाषा घडवावी लागते. मराठी समीक्षेची चौकट आधुनिक काळापूर्ती मर्यादित होती उत्तर आधुनिक काळाची समीक्षा घडवण्यासाठी डॉ. मीनाक्षी पाटील यांचा 'उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता' हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका व मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी पाटील यांच्या 'उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता' या पुस्तकाचे मुंबईत दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे डॉ. मोरे यांच्यासह डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश सप्रे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, जागतिकीकरणाचे पर्यवसान म्हणजे उत्तराधुनिकता आहे उत्तर आधुनिकता जास्त करून साहित्यातून व्यक्त झाली त्यांनी ज्या कविता निवडल्या त्या अत्यंत समन्वयक आहेत पूर्वीची आक्रमणे खैबर खिंडीतून व्हायची ती आता सायबर खिंडीतून होत आहेत.

आधुनिकतेच्या अर्वाचीन आविष्कार म्हणजे उत्तराधुनिकता. डॉ. मीनाक्षी पाटील या पुस्तकामुळे त्यांच्या समीक्षक या नात्याने पुढच्या पुस्तकांची उत्सुकता लागली असून प त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. पाटील म्हणाल्या

१० वर्षाचा कालवधी नजरेसमोर आहे. उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा संशोधनासाठी विषय निवडला आणि सुरुवातीपासून सप्रे सरांनी दिशा दिली, अनेक सा-यांची मदत झाली. या प्रक्रियेतत खूपजण आहेत. मित्रमंडळी, सर्वजण, संशोधनाचे काम करताना प्रचंड आनंद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉप्युलर प्रकाशनाचे प्रकाशक रामदास भटकळ यांनी यावेळी पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले, नामदेव ढसाळ यांच्या कवितेबर या ग्रंथात मांडणी झाली आहे. या पुस्तकांत आगळ्यावेगळ्या विचार सरणीची मांडणी करत फार मोठे शिवधनुष्य लिलया पेलले आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. सचिन केतकर, म्हणाले, उत्तर आधुनिकता संदर्भात मराठी कवितेत हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाच आहे, ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आधुनिकता म्हणजे काय हे स्पष्ट केले असून पाश्चात्य समीक्षकांचा या ग्रंथातला आढावा ही महत्वाचा आहे. समकालीन कवितेची उपयोजीत समीक्षा या ग्रंथाच्या महत्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. रमेश वरखेडे म्हणाले, उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता यांचा अनुबंध शोधतांना फार महत्त्वाची तात्विक मांडणी या ग्रंथात केली आहे . समीक्षेच्या पद्धतीशास्त्र संदर्भानुसार सैद्धांतिक चौकटीतून या विषयाची तसेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्या तत्त्वदर्शनातून मांडणी केली आहे.

उत्तर आधुनिकता ही भांडवलशाहीची सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे. उत्तर आधुनिक तत्व जाणीवेतून कवितेचे बंध कसे वाचावेत याचा पथदर्शक नकाशा डॉ. मीनाक्षी पाटील यांनी या ग्रंथातून मांडला आहे.

उत्तराधुनिक काळातील कविता अनेक आवाजांची सरमिसळ आहे उत्तर आधुनिक कवितेचे साहित्यशास्त्र समीक्षासूत्र निश्चित करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केला आहे काव्य समीक्षेचे नवे पाठ्यपुस्तक म्हणून या पुस्तकाचे सार्वत्रिक वाचन व्हायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. अविनाश सप्रे म्हणाले, आज पर्यंतच्या वादग्रस्त संकल्पनेतील सर्वात वादग्रस्त संकल्पना म्हणजे उत्तर आधुनिकता आहे उत्तर आधुनिकता ही फक्त वाङ्मयात नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आहे,

उत्तर आधुनिकता हे चांगल्या अर्थाने अराजकतावादी तत्त्वज्ञान आहे उत्तर आधुनिक कवितेची भाषा ही अतिशय मोकळी आहे बहुजन आणि अभिजन हे भेदाभेद उत्तर आधुनिकता वादाने मोडीत काढले आहेत भाषेचा मोठा अवकाश या कवितेत आला आहे हा ग्रंथ संदर्भ मूल्य म्हणून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com