
Dombivli Snakebite Case
ESakal
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. 6 - डोंबिवली येथील प्राणवी भोईर आणि श्रुती ठाकूर या मावशी भाचीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयातील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव यांना वैद्यकीय सेवेत कसूर केल्याप्रकरणी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. डॉ. संजय यांची त्यादिवशी रात्रपाळी होती. ते त्यावेळी रुग्णालयात हजर नसल्याची बाब उघडकीस आल्यामुळे डॉ. जाधव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.