
डोंबिवली : डोंबिवली मधील एका कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारीहजेरी लावली होती. या कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी आमदार मोरे यांच्या कामाची स्तुती केली. मात्र ते आज उडी मारत असताना पडले आणि त्यांचा हाच फ्रॅक्चर झाला हेही सांगितले. याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत असून, आमदार कसे काय पडले याची चर्चा आता रंगू लागली आहे.