"ड्रायव्हरलेस मेट्रो' लवकरच मुंबईच्या सेवेत; संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते कोचचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 January 2021

मेट्रो- 2 अ आणि मेट्रो- 7 या दोन्ही मेट्रो प्रकल्पाची ट्रायल रन लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी या मार्गासाठी लागणाऱ्या मेट्रो कोचचे अनावरण शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बंगळूरु येथे करण्यात आले

मुंबई  : मेट्रो- 2 अ आणि मेट्रो- 7 या दोन्ही मेट्रो प्रकल्पाची ट्रायल रन लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी या मार्गासाठी लागणाऱ्या मेट्रो कोचचे अनावरण शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बंगळूरु येथे करण्यात आले. आता लवकरच या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो कोच मुंबईत दाखल होणार आहेत. अनावरण झालेल्या मेट्रो या ड्रायव्हरलेस तंत्रावर आधारित आहेत. 

अनावरण झालेले कोच चारकोप येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर त्याची किमान एक महिना चाचणी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी चारकोप मेट्रो डेपो आणि लाईन 2 आणि 7 येथील कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे "मुंबई काही मिनिटांत' हे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची वाटचाल सुरू असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. 
डिसेंबर 2020 पर्यंत या दोन्ही मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन होते; मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रकल्पाचा वेग मंदावला. आता निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दोन मेट्रोमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यावर भर दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

वैशिष्ट्ये 
- मेट्रो-2 अ प्रकल्प दहिसर ते डी. एन. नगर 
- मेट्रो- 7 प्रकल्प दहिसर पूर्व ते अंधेरी अंधेरी पूर्व 
- ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानावर धावणार मेट्रो 
- 10, 20, 30 आणि 40 रुपयांप्रमाणे तिकीट 
- प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्या ठरविल्या जातील. 

 

मेट्रोसाठी काम करत असलेले अभियंते आणि तंत्रकुशल कामगार यांचा मला अभिमान आहे. आत्मनिर्भर भारताचे हे कामगारच खरे योद्धे असून तेच भारताला पुढे नेतील. 
- राजनाथ सिंह,
संरक्षणमंत्री 

Driverless Metro soon to be in Mumbai service Coach unveiled by Defense Minister

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driverless Metro soon to be in Mumbai service Coach unveiled by Defense Minister

टॉपिकस