अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यापासून अमली पदार्थ तस्करीत वाढ - व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग

4 डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने वेस्टर्न नेव्हल कमांडची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत झाली.
Indian Navy Day
Indian Navy DaySakal
Summary

4 डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने वेस्टर्न नेव्हल कमांडची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत झाली.

मुंबई - 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने वेस्टर्न नेव्हल कमांडची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत झाली. या प्रसंगी व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड, यांनी दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना संबोधित केले.माध्यमांशी बोलताना कमांडर-इन-चीफ यांनी अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे पकडली जात असतील तर याचा अर्थ अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

सागरी मार्गाने जे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे पकडण्याचा आमचा प्रयत्न असून त्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यशही मिळत आहे. या शब्दात, वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी सागरी मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे मान्य केले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यापासून अफगाणिस्तानात तयार होणारे अंमली पदार्थ कुठे ना कुठे निर्यात होत आहेत. जमीन मार्गाने किंवा सागरी मार्गाने निर्यात करता येते.

आपल्या संबोधनात, सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व सागरी क्षेत्रांमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडद्वारे जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या विस्तृत तैनातीबद्दल माहिती दिली. कमांडर-इन-चीफ यांनी समुद्रकिनारी आणि समुद्रात दूर मिशनसाठी जहाजे आणि पाणबुड्यांच्या सतत तैनातींवर प्रकाश टाकला आहे. यातील काही क्षेत्रावर मानव आणि मानवरहित विमानांद्वारे व्यापक पाळत ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कमांडर-इन-चीफ यांनी आपल्या संबोधनात भारतीय नौदलाबद्दल सांगताना भारतीय नौदला राष्ट्राच्या शक्तीचे साधन आहे. प्रसारमाध्यमांकडून विविध प्रश्नांची उत्तरे देताना, व्हाइस अॅडमिरल एबी सिंग यांनी किनारपट्टी सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निवीर, तीव्र हवामानात काम करण्यासाठी एसओपी, समुद्रमार्गे अंमली पदार्थांची तस्करी, स्वदेशी युद्धनौकांचे उत्पादन, भविष्यातील अधिग्रहण यासह इतर प्रश्नाची स्पष्ट उत्तरे दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com