esakal | Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, न्यायालय शिक्षा सुनावत नाही, तोपर्यंत आर्यनला घरचे कपडे वापरण्याची परवानगी

Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Aryan Khan Drugs Case: क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि इतर आरोपींची कोविड चाचणी बुधवारी रात्री करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आर्यनसह इतर सहा आरोपींना सामान्य कैद्यांसोबत बराकमध्ये हलवण्यात येणार आहे. त्याचसोबत जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, न्यायालय शिक्षा सुनावत नाही, तोपर्यंत आर्यनला घरचे कपडे वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र घरच्या जेवणाला परवानगी नाही, त्यामुळे आर्यनला कारागृहातीलच जेवण दिले जाणार आहे. आर्यनने कूपनद्वारे तुरुंगाच्या कॅन्टिनमधून काही बिस्किटचे पॅकेट्स, स्नॅक्स आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला आणि इतर आरोपींना कैद्यांप्रमाणेच ब्लँकेट आणि चादर देण्यात आली आहे.

आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना आर्थर रोड कारागृहात क्वारंटाइन करण्यात आले होते. आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र तरीही कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. आता क्वारंटाइन संपल्यानंतर आर्यन आणि इतर आरोपींना सामान्य कैद्यांसोबत बराकमध्ये हलवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Drugs case: शाहरुख-गौरी आर्थर रोड तुरुंगात सतत करतायत फोन, कारण..

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट यांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) याप्रकरणी पहिल्या दिवशी अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top