esakal | Drugs case: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan

'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Drugs Case: कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानच्या Aryan Khan जामिनावर सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या जामिनाला एनसीबीकडून विरोध करण्यात येत आहे. आर्यन हा बेकायदेशीर ड्रग्ज साखळीत सक्रिय सहभागी होता हे सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट, फोटो इत्यादी स्वरूपात पुरेसे पुरावे आहेत, असं जामीन अर्जावर उत्तर देताना एनसीबीने म्हटले आहे.

एनसीबीने मुनमुन धामेचाच्या जामीन अर्जावर उत्तर देताना म्हटले की, तपासादरम्यान गोळा केलेल्या साहित्यातून बेकायदेशीर खरेदी आणि वितरणाच्या संबंधात आर्यनची भूमिका काय आहे हे उघड झाले आहे. आर्यनने अरबाज मर्चंटकडून प्रतिबंधित अमली पदार्थ खरेदी केले असून त्याचे वितरणही केले आहे. तपासादरम्यान, एनसीबीला असेही काही पुरावे मिळाले आहेत, ज्यातून असं कळतंय की, आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट नेटवर्कच्या संपर्कात होता. या संदर्भात एनसीबी पुढील तपास करत आहे. सहआरोपी अचित आणि हरिजनने आर्यन आणि अरबाजला चरस पुरवला हे स्पष्ट आहे.

हेही वाचा: Aryan Khan Drug Case: 'स्टारकिड्स देश सोडण्याच्या तयारीत'

आर्यनसह पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सुनावणी सुरू आहे. आर्यन सह अरबाज खान, मुनमून धनेचा, नुपूर सतेजा आणि मोहक जैस्वाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सध्या तपास महत्त्वाचा टप्प्यावर आहे आणि तपास यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत. त्यामुळे आता जर आर्यनला जामीन मंजूर केला तर त्यामुळे तपास प्रभावित होऊ शकतो, असा युक्तिवाद एनसीबीकडून करण्यात येत आहे.

loading image
go to top