esakal | कोरोनामुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी; गणेशमुर्ती विसर्जनाचे प्रमाण झाले कमी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी; गणेशमुर्ती विसर्जनाचे प्रमाण झाले कमी

कोव्हिडमुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी आली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा तब्बल 20 हजार 966 गणेश मुर्तींचे विसर्जन कमी झाले आहे

कोरोनामुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी; गणेशमुर्ती विसर्जनाचे प्रमाण झाले कमी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :कोव्हिडमुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी आली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा तब्बल 20 हजार 966 गणेश मुर्तींचे विसर्जन कमी झाले आहे.यातील काही मुर्तींचे विसर्जन हे परीसरातच झालेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी आर्थिंक तंगी तसेच कोव्हिड काळात झालेले विस्थापनही यासाठी कारण मानले जात आहे.

आरतीच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी भन्नाट आयडिया; सोसायटीच्या मजल्यांमध्ये लावले लाऊड स्पीकर

मुंबईत रविवारी मध्यरात्री पर्यंत दिड दिवसांच्या 46 हजार 823 गणपतीचे विसर्जन झाले.तर,गेल्या वर्षी 61 हजार 729 गणपतीचे विसर्जन झाले होते.अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.यंदा कोव्हिडच्या पार्श्‍वभुमीवर मुर्तीच्या उंचीवर निर्बंध आहेत.तसेच,शाडूच्या मातीची मुर्ती प्रतिष्टापना करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.प्रतिबंधीत क्षेत्र तसेच सिल इमारतींमधील मुर्तीचे विसर्जन त्याच ठिकाणी करण्याच्या सुचना महापालिकेने दिल्या आहेत.त्याच बरोबर यंदा लहान मुर्तीचे प्रतिष्टापना करण्यावर भक्तांचा भर होता.त्याच घराजवळ मुर्तीचे विसर्जन झाले असावे अशी शक्‍यता पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये विशेषत: दीड दिवसांच्या गणपतीचे प्रथा रुढ झाली आहे.कोव्हिड काळात यातील अनेक कुटूंब मुळ गावी गेले आहेत.तसेच,काही मराठी कुटूंबही रोजगार बंद झाल्याने गावी गेल्याची शक्‍यता आहे.त्यामुळेही मुर्तींची संख्या कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत मध्यरात्री पर्यंत 978 सार्वजनिक आणि 40 हजार 832 घरघुती मुर्तींचे विसर्जन झाले आहेत.त्यात,710 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले त्याच बरोबर 22 हजार 149 घरगुती गणपतींचे विसर्जनही कृत्रिम तलावात झाले

मुंबईत पावसाचा जोर ओसरताच बसू लागले उन्हाचे चटके; आज दिवसभरात इतक्या तापमानाची नोंद

कृत्रिम तलावात विसर्जन 57 टक्यांनी वाढलं 
कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या गणेशमुर्तीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेने 57 टक्क्यांनी वाढले आहे.गेल्या वर्षी दिड दिवसाच्या 61 हजार 729 घरगुती आणि 201 सार्वजनिक अशा 61 हजार 930 मुर्तींचे विसर्जन झाले होते.यामध्‍ये 14 हजार 442 घरगुती, तर 48 सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते .     यंदा दीड दिवसांच्‍या गणेशमूर्तींची संख्‍या 40 हजार 823 येवढी होती; ज्‍यामध्‍ये 39 हजार 845 घरगुती, तर 978 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता.  कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जित करण्‍यात आलेल्‍या मुर्तींची  संख्‍या 22 हजार 859 इतकी होती.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top