esakal | महाराष्ट्र बंदमुळे मुंबई विद्यापीठाच्या घड्याळाची टिकटिक थांबली | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र बंदमुळे मुंबई विद्यापीठाच्या घड्याळाची टिकटिक थांबली

महाराष्ट्र बंदमुळे मुंबई विद्यापीठाच्या घड्याळाची टिकटिक थांबली

sakal_logo
By
तेजस भागवत

मुंबई : लखीमपुर येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्रांच्या पुत्राने शेतकऱ्यांची गाडीखाली चिरडून हत्या केल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदचा फटका मुंबई विद्यापीठाला बसला. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील मुंबईची शान म्हणून उभ्या असलेल्या राजाबाई टॉवरच्या घड्याळाची टिकटिक बंद झाली. या घड्याळाला चावी देणारी व्यक्ती पहाटे वेळेत पोहोचली नसल्याने घड्याळाचा गजर आज दिवसभर परिसरात घुमू शकला नाही.

मागील वर्षी मार्च एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यानंतर येथे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राजाबाई टॉवरची घड्याळ 299 पायऱ्या चढत जाऊन ती सुरू ठेवली होती. मात्र आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये या घड्याळाची टिक टिक थांबली.

राजाबाई टॉवरमध्ये प्रत्येक तास, अर्धा तासाला आजूबाजूच्या परिसराला आपल्या बेलच्या गजराने वेळेची आठवण करून देत असते. यामुळे संपूर्ण परिसरात घड्याळाच्या आवाज घुमत असतो. मात्र सकाळी चावी देणारी बाह्य संस्थेची व्यक्ती आली नसल्याने विद्यापीठाचे ऐतिहासिक घड्याळ हे पहाटे चारच्या सुमारास बंद पडले. असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. या घड्याळाला चावी ही पहाटे लवकर दिली जाते. यासाठी एका बाह्य संस्थेच्या व्यक्तीची निवड करण्यात आली असून हा व्यक्ती मुंबईत बस वाहतूक बंद असल्याने ती पहाटे पोहचू शकली नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राजाबाई टॉवर हे 1878 साली उभारण्यात आले. हा एकूण. तो 280 फूट उंच असून तो गॉथिक रचनाशैलीच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. तसेच याच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफ करण्यात आला आहे.

राजाबाई टॉवर हे मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांच्या आई च्या नावाने उभारण्यात आले आहे. त्यासथी प्रेमचंद रॉयचंद यांनी टॉवर बांधण्यासाठी १८६९ मध्ये तीन लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या आईचे नाव राजाबाई म्हणून या टॉवरला राजाबाई क्लॉक टॉवर असे नाव दिले गेले हेाते. या टॉवरमधील घड्याळाला एक इव्हिनिंग बेल देण्यात आली होती. सुरुवातीला एक ख्रिश्चन धर्माची प्रार्थना असणारी बेल यातून वाजत होती, मात्र स्वातंत्र्यानंतर त्याची असलेली पाती काढून टाकण्यात आली.

loading image
go to top