वाहतूक कोंडीमुळे कल्याणकर त्रस्त

रविंद्र खरात
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. 

कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. 

मध्य रेल्वेच्या कल्याण सहित कसारा आणि कर्जत रेल्वे स्थानक मधून प्रवासी संख्या वाढत असताना त्या शहरात लोकसंख्या वाढत असून मात्र मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

कल्याण शहरात नागरिक घराबाहेर पडले की रिक्षाचालकांची मुजोरी, रस्त्यांवरील वाहतुक कोंडी, रेल्वे स्थानकात रस्ता शोधावा लागतो बेशिस्त रेल्वे परिसरातील पार्किंग त्यातून निर्माण होणारी वाहतुक कोंडी, अनियमित रेल्वे सेवा, गर्दीतील प्रवास, नोकरीवर लेटमार्क, बढती पगारवाढ यावर परिणाम, सतत मानसिक तणाव व यातून ह्रदयविकार, रक्तदाब, प्रदुषणातील आजार ..अस्थिर मानसिक स्थितीने कुटुंबात चिडचिडपणातून कलह वाढतायेत. स्वास्थ्य हरपतेय ..वाढती महागाई, रस्त्यावरील असुरक्षित प्रवास, चालण्यास फुटपाथ रिकामे नाही, शहरात दुचाकी स्वार आणि रिक्षावाल्यांचा उच्छाद, रेल्वे प्रशासनाचा बेफिकिरपणा,

यामुळे नागरिक त्रस्त आहेत. केंद्र, राज्य सरकार, पालिका कर आणि रेल्वेच्या पास आणि तिकिटाचे पैसे देऊन ही गेली कित्येक महिने रेल्वे सेवा उशिरा धावतेय. गर्दी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकात उसळत आहे. कामावर जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून प्रवासी रेल्वे प्रवास करत आहे. तर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात जीव घुसमटत आहे. सर्व सामान्यांच्या नशिबी मनस्ताप आहे. याबाबत लवकरात लवकर राज्य सरकारने रेल्वे, स्थानिक पालिका, वाहतूक पोलिस, आरटीओ, स्थानिक पोलिस अधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आम्हाला शहरात आणि लोकलमध्ये प्रवास करण्यात यावा यासाठी मदत करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. मुख्यमंत्री फडणवीस काय आदेश देतात याकडे लक्ष्य लागले आहे.

रविवार ता 10 फेब्रुवारी रोजी शहाड रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलाच्या कामासाठी कल्याण ते कसारा मार्गावर मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त होते. सोमवार ता 11 फेब्रुवारी रोजी सकाळी पॉईंट फेल झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी 12 फेब्रुवारी सकाळी सुद्धा 10 मिनिटे उशिरा लोकल धावत होती. तर शहरात वाहतूक कोंडी ने कल्याणकर त्रस्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to traffic jam people are angry in kalyan