मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक; कुर्ला स्थानकात 80 गाड्यांची व्यवस्था 

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक; कुर्ला स्थानकात 80 गाड्यांची व्यवस्था 
Updated on

मुंबई  : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकातून इलेक्‍टिक बाईकची सेवा सुरू होणार आहे. येत्या फेब्रुवारीपासून कुर्ला रेल्वेस्थानकातून ई-बाईकचा वापर करून प्रवासी प्रवास करू शकतील. मध्य रेल्वे आणि युलू या मोबाईल ऍपद्वारे ई-बाईकची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकाच्या पश्‍चिम दिशेकडील बाजूस 80 ई-बाईकची व्यवस्था केली आहे; तर त्यानंतर सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. 
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सोईस्कर होण्यासाठी ई-बाईक सुविधा देण्यात आली आहे. कुर्ला भागात रिक्षा, टॅक्‍सी, बससाठी प्रवाशांना रांगा लावाव्या लागतात. यासाठी कुर्ला आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी)दरम्यान कनेक्‍टिव्हिटी देण्यासाठी खासकरून ई-बाईक सेवा सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, कुर्ल्यानंतर सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

कशी वापराल बाईक? 
प्रवाशांना मोबाईलमध्ये युलू ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. ई-बाईक अनलॉक करण्यासाठी पाच रुपये द्यावे लागतील. त्या प्रवासासाठी त्यांच्याकडून प्रतिमिनीट दीड रुपये शुल्क आकारले जाणार आहे. युलू मोबाईल ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. ई-बाईक अनलॉक करण्यासाठी प्रवाशांना क्‍यूआर कोड स्कॅन करावा लागेल किंवा वाहन क्रमांकाची नोंद करून ई-बाईक अनलॉक करता येणार आहे. 

E-bikes at Central Railway stations from February Arrangement of 80 trains at Kurla station

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com