पालघर जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भिती

प्रविण चव्हाण
गुरुवार, 25 जुलै 2019

डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाड पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी मध्यरात्री 1.02 मिनिटांनी, 1.06 मिनिटांनी आणि 1.12 मिनिटांनी जोरदार धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची इतकी तीव्र असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. 

पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के संपता संपत नसून, बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर आश्रय घेतला. 

डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाड पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी मध्यरात्री 1.02 मिनिटांनी, 1.06 मिनिटांनी आणि 1.12 मिनिटांनी जोरदार धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची इतकी तीव्र असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. 

बुधवारी रात्री 9.49 ला 2.4 रिश्टर स्केलचा ,12:33 वाजता 2.2 रिश्टर स्केल, 12.36 वाजता 1.9 रिश्टर स्केल तर 1.03 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल त्यानंतर पुन्हा 1.06 आणि 1.12 मिनिटांनी जोरदार धक्के जाणवले. मात्र त्याची रिश्टर स्केल क्षमता अद्याप देण्यात आली नाही. यातील 1.03 वाजता सर्वाधिक 4.08 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का असल्याची नोंद झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake in Panghar district