जीव टांगणीलाच! 

संतोष मोरे
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई -  वांद्रे-कलानगर येथील रेल्वे मार्गावरील पुलाचा दीड मीटर रुंद भाग चक्क कॅंटिलिव्हरवर असल्याचे उघड झाले आहे. या पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक होते. धोका टाळण्यासाठी डिसेंबर 2015 मध्ये रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्ल्यूडी) पत्र लिहून ही वाहतूक थांबवण्याची सूचना केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता अंधेरीतील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने पुन्हा केलेल्या सूचनेनंतर पीडब्ल्यूडीने या पुलावरील पादचाऱ्यांसाठीची मार्गिका बंद केली आहे; मात्र उर्वरित दीड मीटर भागातून आजही वाहतूक सुरू असल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावरील धोका कायमच आहे.

मुंबई -  वांद्रे-कलानगर येथील रेल्वे मार्गावरील पुलाचा दीड मीटर रुंद भाग चक्क कॅंटिलिव्हरवर असल्याचे उघड झाले आहे. या पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक होते. धोका टाळण्यासाठी डिसेंबर 2015 मध्ये रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्ल्यूडी) पत्र लिहून ही वाहतूक थांबवण्याची सूचना केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता अंधेरीतील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने पुन्हा केलेल्या सूचनेनंतर पीडब्ल्यूडीने या पुलावरील पादचाऱ्यांसाठीची मार्गिका बंद केली आहे; मात्र उर्वरित दीड मीटर भागातून आजही वाहतूक सुरू असल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावरील धोका कायमच आहे. संबंधित यंत्रणांच्या लेखी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत किती संवेदनशील आहेत, याचीही प्रचीती येते. 

वांद्रे पूर्व-पश्‍चिमेस तसेच माहीमला जोडण्यासाठी पीडब्ल्यूडीने 1961मध्ये रेल्वे मार्गावर हा पूल बांधला. तेव्हा पुलावर तीन मीटर रुंद पादचारी मार्गिका होती. ती कॅंटिलिव्हरवर बांधण्यात आली; मात्र 2015च्या सुरुवातीला पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी पीडब्ल्यूडीने ही मार्गिका दीड मीटरची केली. उर्वरित भागातून वाहने जातात. त्या भागाला केवळ कॅंटिलिव्हरचाच आधार असल्याने रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे ही वाहतूक थांबवण्याची सूचना केली. त्याकडे पीडब्ल्यूडीने दुर्लक्ष केले. रेल्वेलाही या पत्राचा विसर पडला. आता अंधेरीतील अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आल्याने त्यांनी केलेल्या सूचनेनंतर पादचारी मार्गिकेचा भाग बंद करण्यात आला आहे. 

दरम्यान, या पुलाच्या आधारासाठी असलेल्या पिलरचा काही भागही गंजला आहे. तो भाग धोकादायक असू शकतो, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

रेल्वेने पीडब्ल्यूडीला पाठवलेल्या पत्राबाबत माहिती नाही. पत्रव्यवहार तपासून माहिती देऊ. 
- मुकुल जैन, प्रभागी महाव्यवस्थापक, पश्‍चिम रेल्वे 

वसईचा पादचारी पूलही बंद 
वसई रेल्वेस्थानकाला लागून असलेला, वसई पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा विरारच्या दिशेकडील पादचारी पुलाचा एक पिलर धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे तो बंद करण्यात आला आहे.

Web Title: Eastern Railway bridge