खा फुकट... चिकन बिर्याणी, लॉलीपॉप; खवय्यांसाठी खास महोत्सव

राजेश कांबळे
Thursday, 21 January 2021

चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे

पेण  : चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे. 

बर्ड फ्लूच्या भीतीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. परंतु व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही बर्ड फ्लूचा संसर्ग होत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पेण येथे रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने पेण पालिकेच्या मैदानावर "चिकन महोत्सव' भरवण्यात आला आहे. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन लेगपीस, चिकन बिर्याणी आणि अंड्यांच्या पदार्थांचा मोफत आस्वाद देण्यात येणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महोत्सवाला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, नगराध्यक्षा प्रितम पाटील,उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थाचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर आणि सचिव दीपक पाटील यांनी दिली. 
----------------------------------------------

( संपादन  -  तुषार सोनवणे )

eat Chicken biryani lollipop in pen Special festival for foodies


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eat Chicken biryani lollipop in pen Special festival for foodies