मुंबईची कागदी मखरे अबुधाबीला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबई - प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा इकोफ्रेंडली मखरांची मागणी वाढली आहे. मुंबईतील इकोफ्रेंडली कागदी मखरांना थेट परदेशात पसंती मिळत आहे. त्यापैकी सिद्धिविनायक पॅलेस आणि जयपूर पॅलेस अशी संयुक्त मखरे अबुधाबी येथील बाप्पाच्या सजावटीला वापरली जाणार आहेत. 

मुंबईतील इकोफ्रेंडली मखरकार नानासाहेब शेंडकर यांनी 2001 मध्येच थर्माकोलची मखरे बंद करून पुठ्ठ्यांची मखरे तयार करण्यास सुरुवात केली. कागदापासून बनवलेली सुंदर आणि टिकाऊ फोल्डिंगची मखरे ही शेंडकर यांची खासीयत आहे. या मखरांच्या निर्मितीसाठी त्यांनी "उत्सवी' या संस्थेची स्थापना केली. 18 वर्षांपासून त्यांनी कागदी पुठ्ठ्यांची मखरे गणेशभक्तांना उपलब्ध करून दिली आहेत. यंदा त्यांची मखर थेट अबुधाबीला जाणार आहे. तेथील "महाराष्ट्र मंडळा'ने यंदा नानासाहेबांच्या लालबागमधील कार्यशाळेत कागदी मखराची मागणी नोंदवली आहे. यासाठी प्रकाश पाटील हे गणेशभक्त खास अबुधाबीहून मुंबईला आले होते. 25 वर्षांपासून अबुधाबीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. दीड दिवसाच्या या गणपतीसाठी दरवर्षी थर्माकोलच्या मखराचा वापर केला जात होता. यंदा पहिल्यांदाच या मंडळाने इकोफ्रेंडली उत्सवाचा श्रीगणेशा केला आहे. 

वाढती जागरूकता 
अबुधाबीमधील महाराष्ट्र मंडळाच्या गणरायांची सजावट इकोफ्रेंडली असावी म्हणून फुले आणि कागदी मखराचा वापर करणार असल्याची माहिती या मंडळाचे प्रकाश पाटील यांनी दिली. यंदा त्यांची मूर्तीही शाडूची असणार आहे. अबुधाबीतील या दीड दिवसाच्या उत्सवात किमान 10 ते 15 हजार भाविक दर्शन घेतात. 

Web Title: Eco-friendly Ganpati Makhar to Abu Dhabi