पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

अनिश पाटील
Friday, 27 November 2020

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली.

मुंबई  - पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली. 10 तासानंतर भोसले ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयातून बाहेर पडले. परदेशी चलनाच्या प्रकरणात ही चौकशी झाल्याचे करण्यात आली. .

हेही वाचा - राजभवनात हिंदूंनाही उपासनेसाठी जागा द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी

आज सकाळी 10 वाजता ते ईडीच्या कार्यालयात आले. 10 तास ही चौकशी चालली फेमा प्रकरणात भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला. मनी लाँडरींगप्रमाणे ईडी परदेशी चलन कराप्रकरणाच्या प्रकरणांबाबतही फेमा कायद्या अंतर्गत तपास करते. अशाच एका फेमा प्रकरणात ही चौकशी झाली. रात्री साडे आठच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. ईडी परिमंडळ-2 याप्रकरणी तपास करत आहेत. यााबत ईडीचे संचालक एस.के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा - लवकरच मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार; प्रस्ताव सादर करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

2007 मध्ये भोसले परदेशी चलन व महागड्या वस्तू आणल्याप्रकरणी ईडी फेमा अंतर्गत तपास करत होती. पण भोसले यांना नेमक्या कोणत्या फेमाच्या प्रकरणात ईडीकडून बोलवण्यात आले होते. हे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ED inquires about famous Pune businessman Avinash Bhosale

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED inquires about famous Pune businessman Avinash Bhosale