esakal | मोझांबिक ऑईल फिल्ड प्रकरणी व्हिडिओकॉनशी संबंधीत ठिकाणांवर ईडीचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

Enforcement Directorate

मोझांबिक ऑईल फिल्ड प्रकरणी व्हिडिओकॉनशी संबंधीत ठिकाणांवर ईडीचे छापे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आफ्रिका खंडातील मोझांबिक येथील ऑईल फिल्ड (Mozambique Oil Field) विक्रीतून कर्ज बुडवण्याप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने व्हिडिओकॉनशी (Videocon) संबंधीत ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) (ED) शुक्रवारी दिल्ली, मुंबई व औरंगाबाद येथे छापे (Raid) टाकले. केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गेल्यावर्षी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर आता ईडीही याप्रकरणी तपास करत आहे. कर्जाची रक्कम इतरत्र वळल्याच्या संदर्भात कागदपत्रे मिळाण्याच्या उद्देशाने शोध मोहिम राबवण्यात आली. हे प्रकरण मोझांबिकमधील तेलाच्या ब्लॉकशी संबंधित आहेत. (ED Raids Locations Associated with Videocon Mozambique Oil Field Case)

याप्रकरणी व्हिडिओकॉनने लंडनमधील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून कर्ज घेतले. पुढे या व्यवहारातून बँकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते. वास्तविक ऑईल फिल्ड विक्रीची रक्कम एसबीआय बँकेच्या नेतृत्त्वाखालील समुहाशी संबंधीत खात्यात जाणे अपेक्षीत होते. पण ती रक्कम इतरत्र वळवण्यात आली. त्यामुळे बँकांचे मोठे नुकसान झाले. ही कारवाई शुक्रवारी उशीरापर्यंत सुरू होती.

loading image