पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांची इतर संपत्तीदेखील ईडीच्या भोवऱ्यात

पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांची इतर संपत्तीदेखील ईडीच्या भोवऱ्यात

मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार आरोपी प्रवीण राऊत याच्याशी संबंधीत 72 कोटींची मालमत्तेवर सक्त वसुली संचलनालयाने टाच आणल्यानंतर उर्वरीत रकमेचा माग घेण्यावर तपास ईडीचा केंद्रीत झाला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पीएमसी बँकेतील 4355 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भादंवि कलम 409, 420 465, 466, 471, व 120(ब) अंतर्गत एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील 95 कोटी एचडीआयएलच्या मार्फत प्रवीण राऊतने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहाराचे कोणतेही कागदपत्रे करण्यात आलेली नाहीत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, रकमेच्या माध्यमातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहाराती एक कोटी 60 लाख प्रवीणने त्याची पत्नी माधुरी राऊतला दिले होते. त्यातील 55 लाख रुपये(23 डिसेंबर, 2010 ला 50 लाख व 15 मार्च 2011 ला पाच लाख रुपये) विनाव्याज कर्ज म्हणून शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागिदार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. तेथे केवळ पाच हजार 625 रुपयांचे योगदान असताना त्यांना 12 लाख रुपये ओव्हरड्रॉन कॅपिटलच्या रुपाने मिळाले होते. पुढे ते कर्जांत रुपांतरीत झाले. या  दोन व्यवहारांबाबत वर्षा राऊत यांना प्रश्न विचारण्यात येणार आहे. मूळ तपास हा प्रवीण राऊत याच्या गुंतवणीकीबाबत सुरू आहे. या रकमेची आरोपी प्रवीण राऊतने कोठे गुंतवणूक केली. याबाबत सध्या तपास सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले. यापूर्वी याप्रकरणी राकेश वाधवान व वाधवान कुटुंबियांशी संबंधीत 293 कोटी रुपयांची मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. तसेच 63 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

EDs investigation focuses on tracing the suspected amount received by Praveen Raut

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com