नशामुक्तीच्या कामात लॉकडाऊनमुळे बरीच मदत, महिलांमधील व्यसनांच्या प्रमाणात 30 ते 35 टक्के घट

नशामुक्तीच्या कामात लॉकडाऊनमुळे बरीच मदत, महिलांमधील व्यसनांच्या प्रमाणात 30 ते 35 टक्के घट

मुंबई,ता 30 : लॉकडाऊनमुळे अनेक महिला व्यसनांपासून दूर गेल्या असून महिलांमधील व्यसनांच्या प्रमाणात 30 ते 35 टक्के घट झाल्याचे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे 'सोशल ड्रिंकिंग'च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा हा महिलांना झाला आहे. 'कॉर्पोरेट' कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला सिगारेट किंवा मद्याच्या आहारी जातात. कामाच्या निमित्ताने घराबाहेर असताना अशा महिला बऱ्याचदा व्यसनं करतात. लॉकडाऊनमुळे अनेक महिला 'वर्क फ्रॉम होम' करत असल्याने त्यांना व्यसनांपासून दूर जाणे शक्य झाल्याचे ही वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

महिलांमध्ये अधिकतर व्यसन हे तंबाकू खाण्याचे असते. त्यानंतर सिगारेट आणि मद्यप्राशन करण्याचे प्रमाण असल्याचे दिसते. लॉकडाऊन मध्ये अनेक दुकाने बंद असल्याने या वस्तू मिळणे अवघड झाले होते. त्यातून व्यसनापासून दूर राहणे शक्य असल्याचे अनेकांना जाणवले. त्यातून अनेक महिलांनी व्यसनापासून दूर राहण्याचा निर्धार केला. अनेक महिलांना व्यसनापासून मुक्त होण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे ही वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

नशामुक्तीच्या कामात लॉकडाऊनमुळे बरीच मदत मिळाली. नशा करणाऱ्या अनेकांना स्वतःला सिद्ध करता आले. त्यामुळे अनेकांनी नशामुक्तीचा मार्ग अवलंबिला. सरकारने यातून धडा घेऊन नशामुक्ती तसेच उपाचार केंद्राची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

- वर्षा विद्या विलास , सरचिटणीस , नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य

लॉकडाऊन काळात नाशामुक्त होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. गेल्या आठ महिन्यात 35 टक्के महिला नशामुक्त झाल्या असून नशामुक्त पुरुषांचे प्रमाण हे 25 टक्के इतके आहे. यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. देशी मद्य 22.89 टक्के, विदेशी मद्य 18.38 टक्के, वाईन 23.39 टक्के तर बियर 48.34 टक्के घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पादनात ही 46.34 टक्क्यांची घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे मद्य उपलब्ध झाले नाही, यासोबतच अनेकजण नशामुक्त झाल्याचा हा परिणाम असल्याचेही वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

effect of corona lockdown on the percentage of women drinking socially

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com