Eight people died in accident on the Ahmednagar-Kalyan highway Accident latest update
Eight people died in accident on the Ahmednagar-Kalyan highway Accident latest update

Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण हायवेवर ट्रकने दोन वाहनांना उडवलं; अपघातात एकाच कुंटुंबातील चौघांसह ८ जण जागीच ठार

नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्री ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला
Published on

नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्री ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे हा अपघात झाला. दरम्यान मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ), हर्षद मस्करे (वय ४ वर्ष), काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नाहीत.

अपघातानंतर आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याअपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com