
मुंबई : मद्यासाठी पैसे मागितले; आठ जणांनी केला एकाचा खून
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील एका २७ वर्षीय इस्टेट एजंटला (Estate Agent) मद्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून आठ जणांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असून वर्सोवा पोलिस ठाण्यात (varsova police station) खुनाचा गुन्हा दाखल (murder case) झाला आहे. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव सूरज झिंजोटिया आहे. शुक्रवारी (ता. १८) होळीनिमित्त (Holi Festival) वर्सोवा येथील बस डेपोच्यामागील खाडीलगत मॅन्ग्रोव्हच्या जंगलातील कच्चा रस्त्याच्या ठिकाणी झिंजोटिया त्याच्या ओळखीच्या व्यक्तींसह होळी साजरी करत होता.
हेही वाचा: रोता क्यू है, म्हणत नालासोपाऱ्यात माथेफिरूंची पादचाऱ्याला मारहाण, Video व्हायरल
रात्री १० च्या सुमारास मद्यप्राशन करत असताना मद्यधुंद अवस्थेत झिंजोटियाला आणखी मद्य विकत घेण्यासाठी पैसे हवे होते. झिंजोटियाकडे पैसे नसल्यामुळे त्याने मद्यपान करणाऱ्या काही जणांकडून मद्यखरेदी करण्यासाठी उधारीवर पैसे मागितले.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तींनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर बाचाबाची होऊन हाणामारी सुरू झाली. बांबूच्या काठ्यांनी झिंजोटियाला मारहाण केली गेली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत तक्रारदार राकेश झिंजोटिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वर्सोवा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Eight People Killed Suraj Zinjotiya Asking Money For Having Alcohol Mumbai Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..