महामुंबईतील अकरावीचे आठ हजार विद्यार्थी प्रवेशाविना; सव्वा लाख जागा रिक्त

तेजस वाघमारे
Sunday, 10 January 2021

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्यांनंतरही तब्बल एक लाख 24 हजार 285 जागा रिक्त राहिल्या आहेत.

मुंबई  : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्यांनंतरही तब्बल एक लाख 24 हजार 285 जागा रिक्त राहिल्या आहेत. विशेष फेरी दोनची प्रक्रिया संपल्यानंतर सुमारे 8 हजार 939 विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत.

 

अकरावीच्या तीन नियमित फेऱ्या झाल्यानंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बायफोकलची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. यानंतर प्राप्त घलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत पार पडलेल्या तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्यांनंतर ऑनलाइन प्रक्रिया आणि विविध कोटांमधून एक लाख 96 हजार 127 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये कोट्यातील प्रवेश हे 45 हजार 583 इतके आहेत. तर ऑनलाइन प्रक्रियेतून एक लाख 50 हजार 551 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. यानंतर आठ हजार 939 विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडल्याने प्रवेशावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. मागीलवर्षी दोन लाख दहा हजाराच्यावर विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली होती. यंदा ही संख्या घटल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Eight thousand eleven students in Mumbai without admission A quarter of a million seats are vacant

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand eleven students in Mumbai without admission million seats are vacant