चिथावणीखोर भाषण करणारा एजाज अखेर तुरुंगात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

खानला ता. 24 पर्यंत कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मुंबई : चिथावणीखोर भाषणबाजी करणाऱ्या अभिनेता एजाज खानची रवानगी न्यायालयाने अखेर पोलीस कोठडीत केली आहे. खानला ता. 24 पर्यंत कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

हेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' संपवणार 

धार्मिक तेढ आणि सामाजिक शांतता भंग करु नका, असे वारंवार सरकार सांगत आहे. तरीही सोशल मिडियावर चिथावणीखोर भाषणबाजी करून खानने वाद निर्माण केला होता. त्याच्या व्हिडीओला हजारो शेअर मिळाले होते. त्यावरुन नंतर पोलीस फिर्यादीही दाखल झाल्या. अखेर मुंबई पोलिसांनी शनिवारी त्याला त्याच्या खारमधील घरातून अटक केली आणि आज वांद्रे न्यायालयात रिमांडसाठी हजर केले. त्याच्यावर भादंवि 153 अ,.121.117,128 इ. सामाजिक तेढ, चिथावणीखोर भाषणबाजी असे गुन्हे नोंदविले आहेत. मुंबई पोलिसांनी सोशल मिडियासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्याचे उल्लंघन करणार्यांनाही यामुळे लगाम बसेल. 

हेही वाचा...कोरोनापासून आईही मुलाचे संरक्षण करू शकते

बिग बौस रिएलिटी शोमध्ये बिग बॉसच्या घरात असतानाही अनेकदा एजाज खानने वादग्रस्त विधान करुन भांडणं आणि वाद निर्माण केले होते. तेथूनच तो अधिक चर्चेत आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ejaz Khan's departure for provocative speeches finally ends in jail