खडसे, इनामदार यांची नार्को चाचणी करा - अंजली दमानिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

इनामदार यांनी केलेल्या आरोपांचा दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. नाशिकमध्ये खडसे यांची लाचलुचपत विभागाने चौकशी केल्यानंतर इनामदार यांनी आपल्या विरोधात आरोप केल्याचे सांगून त्यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल दमानिया यांनी केला आहे. आपण केलेल्या आरोपांनंतर खडसे यांनी आपल्याला धमकावण्याचे आणि खोट्या खटल्यात अडकवण्याचे प्रयत्न केले. तसेच, द्वयर्थी विधाने करून बदनाम करण्याचे प्रयत्न केले, अशी तक्रारही दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse kalpana inamdar narko test anjali damania politics