knath Shinde sakal
मुंबई
Eknath Shinde : ही दाढी ‘मविआ’ची गाडी खड्ड्यात टाकेल! : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vidhan Sabha Elections 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत, सकाळी उठल्यापासून महायुतीविरोधी आरोप आणि शिव्या देण्यात त्यांना व्यस्त असल्याचे म्हटले, तसेच त्यांना इशारा दिला की, महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात टाकू शकते.
बदलापूर : ‘‘सकाळी उठल्यापासून महायुतीच्या कामांवर निशाणा साधून बदनाम करणे, आणि शिव्या शाप देण्यात महाविकास आघाडी दंग झाली आहे. निवडून आल्यावर काय विकास कराल ते सांगा, माझ्या नादी लागू नका; मला हलक्यात घ्याल तर, ही दाढी तुमच्या महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात टाकेल,’’ या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले.

