एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी?

मुंंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतुन खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत,एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असलं तरी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री?

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल हे स्पष्ट आहे.यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला आमदारांची पसंती असली तरी ते स्वता मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे.संजय राऊत हे शिवसेनेचा दिल्लीतील आवाज आणि जबाबदारी असल्याने त्यांना महाराष्ट्रात परत बोलावणार नाहीत.यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे.एकनाथ शिंदे हे निष्ठावान आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात.शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे ते आक्रमक नेतृत्व असल्याने सभागृहात भाजपला चांगली टक्कर देऊ शकतात.शिवाय शिवसेनेतील 45 आमदार शिंदे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर आठ अपक्षांना शिवसेनेकडे वळवण्यात शिंदे यशस्वी झाले असल्याने शिवसेना नेतृत्व त्यांच्यावर खुश आहे.शिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांसोबत  असलेले त्यांचे चांगले संबंध ही देखील शिंदे यांची जमेची बाजू आहे.


बच्चू कडू यांना मंत्रिपदाची लॉटरी?

राज्यात आपल्या वेगळ्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोनही आमदारांनी शिवसेनेला सर्वप्रथम आपला पाठिंबा दिला.शिवाय बच्चू कडू यांचं विदर्भात चांगलं काम असल्याने याचा फायदा विदर्भात काहीशी कमजोर असणाऱ्या शिवसेनेला होऊ शकतो.त्याचबरोबर बच्चू कडू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.


शिवसेनेच्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान?

नव्या सरकारमध्ये 15 मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात.यात कॅबिनेट मंत्रिपदं अधिक निर्माण करून राज्यमंत्रीपदं कमी करण्याची रणनीती शिवसेना आखू शकते.शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिवाकर रावते,सुभाष देसाई,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,शंभुराजे देसाई,सुनील प्रभू,दीपक केसरकर,उदय सामंत,भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. 


आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात नाही

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच नाव पुढे करण्यात आलं असलं तरी सध्या त्यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता कमी आहे.शिवसेना-भाजपमधील बिघडलेले संबंध,महाविकास आघाडीच शिवधनुष्य, अनुभवाची कमी यामुळे आदित्य ठाकरे यांचा सध्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता कमी आहे.अडीच वर्षानंतर आदित्य यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो.

यांना मिळू शकतो डच्चू

शिवसेनेतून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम याचा समावेश असू शकतो.त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेतून त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं.यामुळे एकाच घरातील दोघे सरकारमध्ये असल्याने मंत्रिमंडळात रामदास कदम यांचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे.याशिवाय रवींद्र वायकर,दादा भुसे,संजय राठोड,तानाजी सावंत,सदा सरवणकर यांना देखील डच्चू मिळू शकतो.


विधानपरिषदेतील 4 जणांना मंत्रिमंडळात स्थान ?

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई,दिवाकर रावते यांच्यासह दोन नवे चेहरे विधानपरिषदेतील असू शकतात.महिला आणि सुशिक्षित चेहरा म्हणून आमदार मनीषा कायंदे यांच्या नावाची चर्चा आहे तर मातोश्रीच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

WebTitle : eknath shinde become CM and bachchu kadu may get cabinet ministry in new government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com