शिंदेंचा एक्झिट प्लॅन बदलला, थेट राजभवनात हेलिकॉप्टर उतरवणार!

eknath shinde with fadnavis
eknath shinde with fadnavisSakal

महाराष्ट्रातील राजकारणात नव्या घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालंय. कारण मागील आठ दिवसांपासून भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या आणि फडणवीस पुन्हा सिंहासन मिळवणार असल्याचं चित्र आहे. (Maharashtra Politics)

मागील आठ दिवसांपासून घडामोडी वायूवेगाने वाढल्या. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात हालचाली होऊ लागल्या. गेल्या ४८ तासापासून यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली असून महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (Sharad Pawar News)

सध्या आमदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. यासाठी भाजप आणि शिंदे समर्थकांनी जोरदार प्लॅनिंग केलंय. गोवा आणि मुंबई विमानतळासोबतच राजभवनाच्या हेलिपॉडचाही यामध्ये समावेश आहे.

eknath shinde with fadnavis
आता पवारच तारणहार... शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते 'सिल्व्हर ओक'वर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदेंच्या बंडाळीने राज्य सरकारला घेरल्याचं स्पष्ट आहे. फडणवीसांनी खेळी यामुळे यशस्वी होत असल्याचं दिसतंय. शिंदे गटातील सर्व आमदारांना गुवाहाटीतून गोव्याला नेण्यात येत आहे. गोव्यातील ताज कन्व्हेनशनमध्ये त्यांची सोय लावल्याची माहिती मिळत आहे. मात्र या ठिकाणाहून विधानभवनाचा रस्ता खडतर होणार आहे.

सेनेच्या गोटात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गद्दारांना धडा शिकवण्यची भाषा कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे आमदारांना मुंबई विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता गाठण्याचा मार्ग खडतर होणार आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ते या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना विमानतळावरून हेलिकॉप्टरने राजभवनात उतरवलं जाणार आहे. उद्या एकनाथ शिंदे गट मुंबईत विमानतळावर दाखल होणार असल्याचं स्पष्ट आहे. राजभवन ते विधान भवनापर्यंत शिंदे समर्थक मानवी साखळी करणार असून आमदारांना सुरक्षित पोहोचवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com