
ठाणे : एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली बसेस मध्ये लावण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीच्या येणाऱ्या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.