एकनाथ शिंदे समर्थक आमदार गोगावले यांच्या कारचा फ्रिवेवर अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

एकनाथ शिंदे समर्थक आमदार गोगावले यांच्या कारला फ्रिवेवर अपघात

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि प्रतोद भातशेठ गोगावले यांच्या कारला मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ अपघात झालांय. अपघातावेळी एका पाठोपाठ ८ कार एकमेकांना धडकल्याचे सूत्रांनी सांगितले.MLA Bharat Gogavale news in Marathi

हेही वाचा: शिवसेनेला आणखी एक धक्का ! मातोश्रीवरील बैठकीला तब्बल 10 खासदारांची दांडी

आमदार भरतशेठ गोगावले सुरक्षित असून ते मंत्रालयात पोहचले आहेत. त्यांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे. सोबतच 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकराल्यानंतर सुरुवातीला सुरतला गेलेल्या निवड आमदारांमध्ये भरत गोगावले सामील होते. गटनेतेपदाचा वाद निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केली होती. भारत गोगावले हे कोकणातील आमदार आहेत.

Web Title: Eknath Shinde Supporter Mla Gogavales Car Accident On Freeway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top