
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल चाळीस हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकायचीच असल्याने शिंदे यांनी काल (ता.१२) आपल्या पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्याचे समजते.