Vikramgad Assembly Elections 2024sakal
मुंबई
Vikramgad Assembly Constituency 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कर्कश आवाजातुन नागरीकांची सुटका
Vidhan Sabha Elections 2024 : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील नागरिक 12 दिवसांपासून प्रचाराच्या कर्कश आवाजामुळे त्रस्त होते. 18 नोव्हेंबरला प्रचार रॅली थांबल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.
मोखाडा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा चौदा दिवसांचा कालावधी मिळाला. त्यानंतर दोनच दिवसांत प्रचार रॅली, चौक सभा आणि वाहनांवर ध्वनिक्षेपकावरुन कर्कश आवाजाने, ऊमेदवारांची प्रचार यंत्रणा राबली. त्यामुळे गेली 12 दिवसांपासून विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मतदार आणि सामान्य नागरिक कर्कश आवाजामुळे त्रस्त झाले आहेत. प्रचाराच्या तोफा सोमवारी 18 नोव्हेंबर ला संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्या कर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.