मतमोजणी सुरू होताच सेनेला पहिला धक्का, सुहास कांदेंचं मत बाद

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray esakal

निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर आणि व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित केला आहे. यानुसार आमदार सुहास कांदे यांनी दिलेलं मत अवैध ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतरच मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Rajyasabha Election 2022)

भाजपने सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. भाजपने तत्काळ दिल्लीला कळवत निवडणूक आयोगाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. यानंतर मतमोजणीची प्रक्रीया थांबवण्यात आली. आठ तासांच्या ब्रेकनंतर मतमोजणी सुरू झाली. मात्र शिवसेनेला सुरुवातीलाच दणका बसला आहे. (Suhas Kande Vote rejected by Election Commission)

दरम्यान, भाजपने आरोप केलेल्या अन्य दोन नेत्यांवर मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं वैध ठरवण्यात आली आहेत. याशिवाय रवी राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर मविआने आक्षेप घेतला होता. मात्र आयोगाने त्यांचं मत देखील वैध ठरवलं आहे.

यामुळे आता 285 पैकी 284 मतांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सस्पेन्स अद्याप कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com