रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तब्बल सात वर्षांनंतर सुरू; सामाजिक संस्थांचा पाठपुरावा

रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तब्बल सात वर्षांनंतर सुरू; सामाजिक संस्थांचा पाठपुरावा

अलिबाग : येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षे बंद होती. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरू करावी यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती. अखेर ती सुरू झाली आहे. 

रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रसूतीकक्ष आहे. येथेच शस्त्रक्रिया कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांना लिफ्ट नसल्याने जिन्याशिवाय पर्याय नव्हता. गर्भवती, वृद्ध, अपंग रुग्णांना त्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागत होता. रुग्णालय 1985 मध्ये बांधण्यात आले. त्यावेळी दोन लिफ्टची सुविधा होती; परंतु कालांतराने यातील एका लिफ्टमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरी लिफ्ट दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. या दोन्ही लिफ्ट तब्बल सात वर्षें दुरुस्तीच्या कामासाठी बंद होत्या. अखेर यातील एक लिफ्ट सुरू झाली असून दुसरी लिफ्ट देखील काही दिवसांतच सुरू होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात लिफ्ट सुरू करावी यासाठी अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यासाठी आंदोलनही करावे लागले होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आर्थिक मदत केली. यामुळे हे काम होऊ शकले. याठिकाणी चार लिफ्ट गार्डस असणे आवश्‍यक आहे. 
- दिलीप जोग,

सामाजिक कार्यकर्ते. 

जिल्हा रुग्णालयाच्या लिफ्टच्या तळाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असे. यासाठी मजबुतीकरण करणे आवश्‍यक होते. नव्या लिफ्टमध्ये अद्ययावत सुविधा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लिफ्टमध्ये अपघात टाळण्यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत. 
- डॉ. सुहास माने,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड 

Elevator at Raigad District Hospital starts after seven years 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com